Friday, June 26, 2015

-------- कोडं --------

एक कोडं पडलंय अगं मला
उत्तर त्याचं शोधायचं ….
का रोज छान वाटणाऱ्या ह्या सकाळी,
मला आज डोळे बंद करून पडायचंय ?

खूप काही सांगायचय तुला,
पण शब्दच नाहीयेत जुळत ….
दुखावलंय त्यांनी तुला एकदा,
हेच तर नसेल न ग माझ्या वाक्यांना खुपत ?

तुझ्या दुःखात रडतो अगं मी,
तुझ्या हसण्याने खुश होतो अगं मी,
चेहऱ्यावर चेहरा लावून शिकीन मी जगायला,
पण सांग ना कसं समजावू ह्या मनाला,
तुझ्यावर प्रेम न करायला ?

Tuesday, August 10, 2010

--ती--


पण आज ठरवलं कि मुठ उघडायची ,
अन लगेच वाऱ्याच्या या वेगात ती दुप्पट वेगाने निघाली..
किती छान दिसतेय ना ती उडताना , वाऱ्याच्या या लयीन बरोबर डोलताना ..
मिसळायला तसं तिला आवडयचच , तरीच किती चटकन हरवून गेलीय या वाऱ्यात ...
पण तिचा ना एक वेगळाच लळा लागतो, काचेतून तिला एकटक पाहायचो आणि तेवढाच काळ मोजायचो ..
मग एवढं भान हरकलं कि जोऱ्याच्या वाऱ्याकडे लक्षच नाही गेलं आणि क्षणात काचेचे तुकडे झाले ..
वाऱ्याबरोबर उडताना पाहून काळीज हललं , मग धरला तिला मुठीत ..
पण शेवटी ती रेतंच , जेवढं तिला पकडायला जावं तेवढी ती निसटायचीच ..
आता तुटलेल्या काचेला जोडावं तरी कसं , आणि जगायचा काळ मोजावा तरी कसं ..
पण वाऱ्या लेका तुलाही तिचा लळा लागेल , थोड्याच वेळात तिचा रंग तुला चढेल ..
- प्रमोद -

Tuesday, April 20, 2010

Monday, March 29, 2010

इच्छा वेड्या मनाची


आज फार इच्छा होतीय , तुला येऊन भेटावं ...
तुझा हात हातात घेऊन वार्‍याशी खेळावं ..

तुझ्या शेजारी बसून चांदण्या मोजावं ..
चंद्र प्रकाशातला तुझा चेहरा तासन् तास बघावं ..

रात्रीच्या थंडीला माझ्या मिठीने दूर करावं ..
तुझ्या केसांचा गंध माझ्या मनात उतरावं ..

केसांची बट तुझी चेहर्‍यावरुन बाजूला सारावं ...
स्पर्शाची शहारे तुझ्या अंगावर जाणवावं ..

खरंच आज फार इच्छा होतीय तुला स्वप्नात तरी भेटावं ..
पण बघ ना रात्रभर उघड्या डोळ्यांना स्वप्न तरी कसं पडावं...

Thursday, November 13, 2008

Tuesday, May 20, 2008

VICHAR................





mi vichar kartoy ki mi yevdha ka vichar karato .... lokanna vicharla ki vichar karana vayeet asata ka tar te thoda vel vichar karatat ani mhantat ki vichar karana vayeet asata .... [:)]

Thursday, March 6, 2008

to ani ti ......

dolyanchi bhasha kadachit tila samjat nasel,
othananni kay bolayacha he tyala umjat nasel,
ekmekanbarobar asunhi,
mhanunch tyanna ekta ekta vatat asel