
आज फार इच्छा होतीय , तुला येऊन भेटावं ...
तुझा हात हातात घेऊन वार्याशी खेळावं ..
तुझ्या शेजारी बसून चांदण्या मोजावं ..
चंद्र प्रकाशातला तुझा चेहरा तासन् तास बघावं ..
रात्रीच्या थंडीला माझ्या मिठीने दूर करावं ..
तुझ्या केसांचा गंध माझ्या मनात उतरावं ..
केसांची बट तुझी चेहर्यावरुन बाजूला सारावं ...
स्पर्शाची शहारे तुझ्या अंगावर जाणवावं ..
खरंच आज फार इच्छा होतीय तुला स्वप्नात तरी भेटावं ..
पण बघ ना रात्रभर उघड्या डोळ्यांना स्वप्न तरी कसं पडावं...